एखादा परकीय भाषेतील शब्द जर मराठी भाषकांमध्येही
बऱ्यापैकी रुळला असेल, तर तो गझलेत वापरायला हरकत नाही
मराठी भाषकांना अनेक भाषा अवगत असतात, हे खरेच. अनेक भाषांतले शब्द त्यांना मुखोद्गत असतात. तेव्हा त्यांना एखादा परकीय भाषेतील शब्द 'माहीत असणे' आणि मराठीत तो 'रुळणे' ह्यात काही फरक सांगता येईल का?
उर्दू, हिंदी, फार्सी इ. भाषांत गझला करताना मराठी/इंग्रजी (कवीला आणि ऐकणाऱ्याला माहीत असलेले, कुठल्याही भाषेतले) शब्द वापरण्याविषयी काय नियम / संकेत आहेत? अशी काही उदाहरणे आहेत का?
बंधने कडक असतात
अशी 'बंधने' नीट पाळण्याने कविता काय किंवा रोजची भाषा काय ... जास्त सुंदर होत असते असे मला वाटते.