महेशजी!
गझलेमधे भाषा शक्यतोवर बोलीभाषा असावी, असे जाणकार म्हणतात.
गझल जितकी बोलकी, तितकी ती सुंदर मानली जाते.
मराठी भाषेत जर एखादा हिंदी शब्द आला, जो बोलताना सर्रास वापरला जातो, समजायला सोपा असतो, लोकांच्या दैनंदिन व्यवहारात तो रुळलेला/रुजलेला/रूढ असतो, तो कधी तरी वापरला तर चालावे!
पण शक्यतोवर मराठीच शब्द वापरावेत!
इथे इन्सान काफिया बसत होता व खूपच रोजच्या वापरातला असल्याने गंमत म्हणून आम्ही तो वापरला! काफियाखेरीज अन्य जागी मात्र आम्ही त्यास थारा दिला नसता हे मात्र निश्चित!
सगळेच काफिये हिंदी/वा अन्य भाषेतील, असे मात्र करू नये.
गझल हा सर्वांग सुंदर काव्यप्रकार आहे.
तिचे सर्व ताल, तोल, डौल, नखरे सांभाळून तंत्रशुद्ध, लालित्यपूर्ण व प्रासादिक गझललेखन करण्यातच मौज असते!
शेर सहज, सोपे, थेट, गोटीबंद, डौलदार, आशयगर्भ व व्यामिश्र असल्यास गझलेत गंमत येते!
.........प्रा.सतीश देवपूरकर