मिलिंदजी!
वेड घेवून पेडगावला जाण्यासारखा प्रकार वाटला आपला हा प्रतिसाद वाचून!
गझल बोलकी असावी यात एवढेच सूचीत करायचे आहे की, शेरांचा आशय थेट वाचकांपर्यंत पोचावा. म्हणजेच भाषा अशी असावी की, उगाचच शब्दबंबाळपणा, वा संस्कृतप्रचुर बोजड शब्द वापरणे वा आगंतुक शब्द योजणे टाळावे!
आता शेर संवादात्मक लिहा वा स्वगतात्मक लिहा, तो काय बोलतो आहे, हे महत्वाचे असते!
शेरांचे शाब्दिक, लाक्षणिक व ध्वन्यार्थ काय आहेत हे महत्वाचे!
व्यामिश्रता म्हणजे complexity, अर्थांचा बहुपदरीपणा.........हे
कामयाब शेराच्या अंतरंगाचे लावण्यलक्षण मानले जाते!
मुळात शेर आशयघन असायला हवा!
मग तो बोलका आहे, की, अबोल आहे की, घुम्या आहे ही नंतरची बाब झाली.
मुळात शेरातील खयालातच काव्य असायला हवे!
शेराचा नुसता गद्य अर्थ देखिल माणसास हलवू शकतो!
व्यामिश्रता/ अर्थांचा बहुपदरीपणा म्हणजे लिखाणातील भोंगळपणा वा संदिग्धता नव्हे!
आपला काही तरी गैरसमज झालेला दिसत आहे!
खऱ्या कामयाब शेराचा अर्थ कितीही जरी सांगितला तरीही चिमुटभर उरतोच, कारण तो शेर शब्दांच्या पलीकडचा असतो. म्हणून अशा शेरात एकाचवेळी अनेकांना त्यात आपले प्रतिबिंब पहावयास मिळते.
मराठी/अमराठी शब्द हा मुळात वादाचा मुद्दा होवूच शकत नाही. हा ज्याच्या त्याच्या अभिरुचीचा व अभिव्यक्तीचा प्रश्न आहे!
मुळात शेरात/ आशयात किती दम आहे, हे महत्वाचे असते.
बरेचवेळा सपाट/विधानात्मक शेर मराठीत लिहिलेले आढळून येतात असे खेदाने व दुर्दैवाने म्हणावे लागत आहे.
मग असे शेर कितीही गोटीबंद, तंत्रशुद्ध लिहिलेले का असेना, जाणकारांच्या लेखी
त्यांना फारसे मोल नसते!
इन्सान काफिया केवळ एक गंमत म्हणू आम्ही वापरला, हे आम्ही आधीच म्हटले आहे! काफियेतर अन्य जागी असा अमराठी शब्द वापरण्याला आम्ही तरी थारा दिला नसता.
गोंधळ वाढवणाऱ्या इतक्या कोलांट्या व शाब्दिक कसरती वगैरे वाचल्यानंतर आम्ही इतकेच म्हणू की,
झोपी गेलेल्यालाच जागे करता येते, पण..........
........प्रा.सतीश देवपूरकर