मिलिंदजी!
आपण म्हणतो तू कुठल्या मातीचा बनला आहेस.
म्हणजे ज्या गावाच्या/भागाच्या मातीत आपण जन्मास येतो, जणू त्यावर आपल्यातले व्यक्तित्वगुण ठरतात.
बऱ्याच क्षेत्रातील मोठी मंडळी कोकणात जन्मलेली दिसतात.
याचा अर्थ मोठी मंडळी फक्त कोकणातच जन्मास येतात असा नाही!
कोकणातील लोक काटकसरी, परखड पण मनाने निर्मळ असतात व शुद्ध मराठी बोलतात असे आमचे वैयक्तिक मत आहे.
त्यांच्या स्वभावात एक गोडवा असतो. सौजन्य असते!
कोकणातील हापूस आंबा गोडव्यात एक नंबर असतो.
जणू तशीच येथील माणसेही तशीच हापूस आंब्यांसारखी मधुर असतात!
महेशजी ही आमची भावना! हा आमचा अनुभव!
हा आमचा कल्पनाविलास!
आता याला आपण निरंकुश कल्पनाविलास/काव्य म्हणत असाल तर ते आपले मत झाले, ज्याचा आम्हास आदर आहे!
........प्रा.सतीश देवपूरकर