ईक्ष्वांकुच्याच उत्तराला जोड देत आहे. जर गीतेचा आधार घेऊन  गायीच्या प्रश्नाला उत्तर द्यायचे झाले तर परमेश्वराचे खरे स्वरूप निर्विकार, निराकार आणि (?) आहे. तो सर्वव्यापी आहे.

आता जर तो सगळ्या जीवसृष्टीमध्ये निवास करून असेल तर गायीमध्ये का नसावा? आणि मग जर तो गायीमध्ये असेल तर गाय हे देवाचे स्वरूप का नाही? जर हिंदू धर्मात एका काळामध्ये देवाची एखादी व्याख्या असेल तर ती दुसऱ्या काळात बदलावी हे विधान जरा न पटण्यासारखेच आहे.

अर्थात कोण कोणाला देव मानतो हा प्रश्न ज्याचा त्याचा आहे. संगणक विक्रेता आपल्या संगणकाला देव मानेल, शेतकरी आपल्या बैलांना देव मानेल. तर खाटीक त्याच्या अवजारांना..