सगळ्याच शब्दांना प्रतिशब्द शोधत बसणे म्हणजे जरा अट्टाहास होईल.
रॅम ,रॉम/रोम ,सीपीयू ,डायोड ,ट्रायोड ,ट्रान्झिस्टर ,आय. सी.,
सी. डी. , मोडेम इ. आणि असे बरेच शब्द भाषांतर करून वापरणे सयुक्तिक ठरावे का?
संगणकीय परिभाषा ही अनुवादाने समृद्ध होईल असे वाटत नाही.
उलट अंगाने विचार केल्यास
लाडू, करंज्या, चकल्या, कडबोळे
पाट, वेणी, अंगण सारवणे
आट्यापाट्या, विटी दांडू
दाभण, विळी, किसणी, कोयता
असे मराठी शब्द इतर भाषांत अनुवाद करून कसे वापरणार?
स्मरणशक्ती-memory
संगणकाचा पडदा- screen
इ.
असे आणि अजून काही शब्द योग्य वाटतात पण प्रत्येक शब्दाला प्रतिशब्द योजून ते वापरणे हे योग्य वाटत नाही.
-नीलहंस.