ही कथा मला काहीसा (मंद) कृष्णविनोदाचा (ब्लॅक ह्यूमर) (यशस्वी) प्रकार वाटला.

खूप पूर्वी व. पु. काळ्यांची  'हप्ता' नावाची एक कथा दिवाळी अंकात वाचली होती ती आठवली. तीही काही दूरान्वयाने अशाच पतिपत्नीच्या विषयावर होती. मात्र मला तिची हाताळणी टोकाची बेतलेली आणि ओबडधोबड वाटली होती. वरील कथा मात्र तशी नाही.