अनुवादित असल्यामुळे शैली अथवा भाषेबद्दल फारसे लिहिता येणार नाही पण मराठी वाचकांना विषयाच्या नावीन्यामुळे आवडू शकेल. रारंग ढांग ची आठवणही येऊ शकेल. लहरी आणि क्रूर निसर्गाशी झुंजणारा एकाकी मानव हा महाकथा आणि महाकादंबऱ्यांचा विषय बनलेला आहे. जॅक लंडन आणि हेमिंग्वेचा म्हातारा ही चटकन आठवणारी नावे. एक वेगळी पार्श्वभूमी मराठी वाचकांसमोर आणल्याबद्दल अभिनंदन.