आपली प्रतिक्रीया टोकाची वाटते. म्हणजे मीही काही देव वगैरे फारशी मानत नाही... पण विशेषतः  दुःखाच्या आणि संकटाच्या घडीला, हतबल झाले असे वाटते तेव्हा... त्याची आठवण येतेच. काहीही दोष नसतांना (म्हणजे व्यसन, जाडी इ इ) अनेक वर्षे दुर्धर आजाराने अंथरुणाला खिळलेले लोक (आणि  त्यांची शुश्रृषा करताकरता आपलं आयुष्य विसरलेले आप्त), मुलींची विनाकारण लांबलेली लग्नं, अपंग अथवा मतीमंद मूल, घरातल्या कर्त्या पुरुषाचा अचानक मृत्यू....... माणसाच्या अतीव दुःखांची अशी यादी न संपणारी आहे. जो प्रत्यक्ष भोगत असतो त्यालाच ते कळतं.. आणि अशा वेळी त्याला एका श्रद्धेचा, आधाराचा हात खूप बळ देतो.. हे मला आता पटू लागलेलं आहे. म्हणून देवावर नसला तरी त्यांच्या भक्तीवर, श्रद्धेवर माझा आताशा विश्वास बसू लागला आहे!