गोपाळराव हयात असते तर त्यांच्या लग्नाचा वाढदिवस असा (थाटात? ) साजरा झाला असता असे वाटले नाही. किंबहुना ते हयात नसल्यामुळेच इतरांना हा समारंभ असा आयोजता आला (की काय?) असे काहीसे मनात आले. गोपाळरावांच्या तत्त्वनिष्ठेशी इतरांना काही सोयरसुतक नव्हते. केवळ त्यांचा फोटो समारंभाला पुरेसा होता. एरवी पतीचा / वडिलांचा मृत्यू ही सामान्यतः दुःखाची घटना; मात्र येथे ती आनंदाच्या प्रसंगात बदलल्यासारखी दिसली. अशा अर्थाने कृष्णविनोद.
अर्थात इतक्या स्पष्ट आणि बटबटीतपणे सारे कथेत आले आहे असे मला म्हणायचे नाही. कृष्णविनोदाची छाया अत्यंत मंद अशीच मला जाणवली.