सन्जोप रावांप्रमाणे मी देखील ह्या गझलेतील विचारांशी बिलकुल सहमत नाही आहे. अर्थात, इतरांनी आपल्याशी सहमत असावे अशी आपली अपेक्षा देखील नसावी. परंतु, ही गझल आणि त्यावरील प्रतिसाद वाचून माझ्या मनात काही विचार आले ते मांडावेसे वाटतात.
मला वाटते की अगदी लहानपणापासून तरुण होईपर्यंत माणसावर त्याच्या शिक्षकाचा खूप प्रभाव पडतो. लहानपणी तर पालक आणि शिक्षक हे आपले आदर्श असतात. विद्यार्थिदशेत माणूस बराच काळ आपल्या शिक्षकांसमवेत घालवतो; त्यामुळे शिक्षकांच्या विचारांचा विद्यार्थ्यांच्या विचारसरणीवर खूप प्रभाव पडतो. तेव्हा शिक्षकाने विद्यार्थ्यांना प्रत्येक गोष्ट तर्काच्या/विज्ञानाच्या कसोटीवर तपासून मगच स्वीकारावी हे शिकवले पाहिजे.
पण विशेषतः दुःखाच्या आणि संकटाच्या घडीला, हतबल झाले असे वाटते तेव्हा... त्याची आठवण येतेच. काहीही दोष नसतांना (म्हणजे व्यसन, जाडी इ इ) अनेक वर्षे दुर्धर आजाराने अंथरुणाला खिळलेले लोक (आणि त्यांची शुश्रृषा करताकरता आपलं आयुष्य विसरलेले आप्त), मुलींची विनाकारण लांबलेली लग्नं, अपंग अथवा मतीमंद मूल, घरातल्या कर्त्या पुरुषाचा अचानक मृत्यू....... माणसाच्या अतीव दुःखांची अशी यादी न संपणारी आहे. जो प्रत्यक्ष भोगत असतो त्यालाच ते कळतं.. आणि अशा वेळी त्याला एका श्रद्धेचा, आधाराचा हात खूप बळ देतो..
मराठीप्रेमीताई,
खरे सांगायचे तर वर दिलेल्या यादीतील दुःखे ही विनाकारण भोगावी लागत नसतात. उदा. दुर्धर आजार होण्यास केवळ व्यसन अथवा जाडी हीच कारणे असत नाहीत. अनेकदा खाण्यापिण्याच्या/उठण्याबसण्याचालण्याच्या चुकीच्या सवयी, आजूबाजूच्या लोकांच्या विचारांचा प्रभाव पडून आपल्या सवयींत होत जाणारे बदल, एकूणच आपल्या जीवनमानात झालेले बदल, व्यायामाचा अभाव, हवेतील प्रदूषण आणि व्यक्तीची प्रतिकारशक्ती, शरीरातील जीन्स (genes) आणि त्यांच्यात होणारे बदल, इत्यादी गोष्टी आजारपण देण्यास पुरेशा असाव्यात असे वाटते. अपघातासाठी व्यावसायिक/घरगुती कारणांमुळे निर्माण होणारे मानसिक ताणतणाव, वाहतुकीचे नियम न पाळणे अशी कारणे असू शकतात. विनाकारण लांबलेल्या लग्नाबद्दल बोलायचे झाल्यास लग्नाबाबत आणि जोडीदाराबाबत असलेल्या अवास्तव अपेक्षा, किंवा कुंडली पाहणे आणि ती 'न जुळणे' ह्यांसारख्या अनावश्यक पण अकारण खोडा घालणाऱ्या गोष्टी समर्थ आहेत. गरोदरपणी योग्य आहार न घेणे आणि योग्य व्यायाम न करणे, आनुवांशिकता ह्यांमुळे एखादे मूल मतिमंद अथवा अपंग जन्मू शकते. केवळ लगेच दृश्यमान असणारी कारणे नाही आहेत किंवा आपल्या स्वतःच्या अपुऱ्या ज्ञानामुळे (उदा. वैद्यकीय) काही गोष्टींची आपण तर्कशुद्ध संगती लावू शकत नाही आहोत म्हणून ही दुःखे विनाकारण आहेत असे म्हणता येत नाहीत.
परमेश्वर ही एक हायर पावर आहे, जिची ज्याच्या त्याच्या मनाप्रमाणे संकल्पना असू शकते! श्रद्धेचे मानवी जीवनातील मोल हे अनमोल असते!
एखाद्या काल्पनिक गोष्टीबद्दल कोणाच्या मनात काय काय संकल्पना आहेत हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु श्रद्धेचे मानवी जीवनातील मोल हे 'अनमोल' का असते हे कळले नाही. आपण केवळ स्वतःबद्दल न बोलता एकूणच मानवी जीवनाबद्दल बोलता आहात त्यामुळे मला हा प्रश्न पडला.