वृकोदरसाहेब,
गायीला समजा देव मानलेच तर तर तिचे स्वच्छंद हिंडणे हे गायधार्जिण्यांना मान्य आहे असे काहिंसे आपल्या प्रतिसादावरून वाटते.
शिवाय गायीच काय- बैल, म्हशी, घोडे, बकऱ्या (पुण्यात टिळकरोड वरूनही एका वेळेस किमान ५००-६०० बकऱ्या मालकाविना) एवढेच नाही तर माकडांच्या टोळ्याही पुण्याच्या पेठांतून फिरताना - अगदि परवापर्यंत मी पाहिल्या आहेत. सांगायचा मुद्दा असा की हे रहदारीला घातकच आहे हे मान्य आहेच पण त्याचा देव मानण्याशी काही संबंध नाही असे वाटते. खरे तर आपणही या प्राण्यापक्षांच्या रहाण्या-फिरण्याच्या जागांवर, पर्यावरणावर परिणाम केलेला आहे त्यामुळे ते तरी कुठे जाणार बिचारे! परंतु असो. तो मुद्दा निराळा आहे.