तुमची प्रतिक्रीया इतकी स्वच्छ तर्कशुद्ध आहे की प्रतिवादास मुद्दाच नाही.. संजोप रावांप्रमाणेच. पण वास्तविक जीवनात माणूस इतका तर्कदुष्ट, परफेक्ट नसतो ना! जीवनशैलीत विपरीत बदल होतात, व्यायाम अगदी होत नाही, घरच्या विवंचना पाठ सोडत नाहीत, मोह होतात....आणि मग त्याचे परिणाम पुढे आले की मात्र तंतरते. असे अगदी घरोघरी असते ना!
आणि माणसाच्या मनाचे खेळ तर अजून अगम्य! बरोबर काय आणि चूक काय समजेनासे होते.
दुःखाचा मुकाबला करण्यासाठी देव, श्रद्धा, भक्ती यांची मदत घेणे यापलीकडे देवाचा तरी अपमान काय असणार? ' यात काय देवाचा अपमान? आपल्या लेकरांचे होईल तितके संरक्षण करणे त्याचे कर्तव्यच नाही का? मूल हट्टाने काही मागणारच!
बाकी संजोप रावांच्या अभिरुची बद्दल आणि व्यासंगाबद्दल आणि सौंदर्यबोधाबद्दल (इथे अप्रस्तुत असले तरीही)... काहीही प्रत्यवाय नाही. ती अतिशय निर्विवाद पणे सखोल आणि उच्च आहे....