जयंत पवारांचे अभिनंदन आहेच पण धागाकर्त्यांचेही अभिनंदन कारण मराठी साहित्यविश्वातील घडामोडींविषयी मराठी जालविश्व सहसा उदासीन असते. राजकारणावर जितक्या हिरीरीने मते मांडली जातात तशी साहित्यकारणावर मांडली जात नाहीत.या पार्श्वभूमीवर हा लेख एक सुखद अपवाद होता. तशी पुस्तक-परीक्षणे वगैरे खूप असतात पण घटनांची दखल घेणे कमीच.

नारायण सुर्वे (आणि नामदेव ढसाळ)यांचा अपवाद वगळता विद्रोही साहित्यामध्ये बहुधा गावकुसाबाहेरच्या ग्रामीण वास्तवाचे दर्शन घडते, महानगरी वास्तवाचे सहसा कमीच. ही कमतरता जयंत पवारांचे साहित्य भरून काढीत आहे. खूप भेदक वगैरे  नसले तरी ते लक्षवेधी आहे खास.या उमद्या लेखकाला पुढेही असेच यश मिळो ही इच्छा.