वपुंच्या कथा मला आवडतात. पण "हप्ता" वाचल्याचं मला आठवत नाही.
व. पु. काळ्यांची 'हप्ता' कथा (अत्यंत संक्षिप्त रूपात) मला आठवते ती अशी:
लेखकाला घरातल्या वस्तूंसाठी उसने पैसे हवे असतात. त्याच्या ऑफिसात 'दोंदे' नावाची व्यक्ती इतरांना हप्त्यावर पैसे उसने देत असते. त्या दोंदेची ही गोष्ट. कसल्याही 'हौशीच्या' तो विरुद्ध असतो. त्याच्या घरात कोठलीही सुखसाधने नसतात. मुलांचे कपडेही सगळे एकाच ताग्यातले असतात वगैरे वगैरे .... तो पुढे मरतो. घरातल्या इतरांना त्याचे पटत नसतेच त्यामुळे घर नंतर बदलते. चारचौघांसारखे होते ... पण त्याची बायको त्याची आठवण म्हणून पूर्वीच्याच रंगाचे साडे पोलके नेसत असते. ... अशी काहीशी कथा होती. कदाचित नंतर तिचे शीर्षक बदलले असेलही.
अर्थात केवळ 'नवऱ्याची तत्त्वनिष्ठा, त्याचा मृत्यू आणि त्याची आठवण' इतकाच ह्या कथेचा वरील कथेची संबंध वाटला. बाकी काही नाही.