सुंदर लेख आणि तेवढाच छान अनुवाद. अनुवादातून या छान लेखाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.
लेख पुन्हा पुन्हा वाचला. वाचताना बरेचदा सुहास शिरवळकरांच्या कथा ( विशेषकरून 'अमर' कथा) आठवल्या. या लेखावरून सहज म्हणून आठवले की सुहास शिरवळकरांच्याच एका पुस्तकातील गोष्टीचे सूत्रच असे आहे की रहस्यकथाकार एखादी कथा लिहितो व त्यात कथेतील हिरो/ हेर त्याच्या चातुर्याच्या जोरावर गुन्हेगाराला शोधून काढतो. हे करताना तो त्या घटनेतील लूपहोल्स शोधतो व यशस्वी होतो. आता कथेचा नायक/ गुप्तहेर त्याच्या चातुर्याने हे शोधतो म्हणजेच तो लेखकच गुन्हेगार आहे, मठ्ठ पोलीस आहे व तोच गुप्तहेर सुद्धा आहे , त्यानेच गुन्हा केला आहे, निर्बुद्धपणे पोलीस तपास तोच करत आहे, गुन्ह्यामध्ये लूपहोल्स त्यानेच ठेवली आहेत व ती ओळखण्याचे कामही लेखकच गुप्तहेर बनून करत आहे. अशा एखाद्या नावाजलेल्या रहस्यकथाकाराला हाताशी धरून अजिबात लूपहोल्स न ठेवता एखाद्या गुन्ह्याची ( खून/ दरोडा ) कथा लिहून घेतली व त्याप्रमाणे खून केला/ दरोडा टाकला तर गुन्हेगार सापडण्याची शक्यताच नाही. असे काहीसे कथासूत्र होते त्या पुस्तकाचे.
वरील लेखाबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.