नरेंद्र मोदी हे अन्त्ययमक झकास. ते सुचल्याबद्दल दाद घ्या. बाकी काही ठिकाणी दीर्घाचे ऱ्हस्व करून ही रचना वृत्तात सहज बसते
निवडणुकित हे विजयी होती नरेंद्र मोदी!
बीजेपीची धुरा वाहती नरेंद्र मोदी!!
येडियुरप्पा गेले तेव्हा झालि परीक्षा....
पक्ष फाटु दे, तोही शिवती नरेंद्र मोदी!
अंबानी अन् टाटा मागे उभे राहती!
नॅनोचा संसार वसवती नरेंद्र मोदी!
हवा भाव अन् हवी सबूरी पक्षापाशी;
नवनवीन उद्योग फुलवती नरेंद्र मोदी!
उगा कशाला धावावे मागुनी मतांच्या?
सोनियासही पहा हरवती नरेंद्र मोदी!
मनोगतावर गझलांचे हे रान माजले
वाचकांसही सद्गति देती नरेंद्र मोदी!!