'बीजेपी' हा मराठी शब्द नाही. (मराठीत 'भाजप' असा पर्याय प्रचलित आहे.) सबब, अनुक्रमणिकेच्या सोयीकरिता शीर्षक बदलता येईल काय?

मात्र, 'भाजपची धुरा वाहती नरेंद्र मोदी' हे वृत्तात बसत नाही.

'भाजपाची धुरा वाहती नरेंद्र मोदी' असा एक पर्याय वृत्तात बसवता येतो. मात्र, त्याही परिस्थितीत, (१) 'भाजपा' हा पर्याय हिंदी (अत एव परभाषीय) आहे, शिवाय (२) 'भाजपा'मधील 'पा' हा 'पार्टी'चा (म्हणजे पुन्हा परभाषीय शब्दाचा) संक्षेप आहे, असे आक्षेप (अर्थात पुन्हा आमच्याकडूनच) येऊ शकतात. त्यामुळे हा पर्याय आपोआपच बाद ठरतो.

एक पर्याय सुचवावासा वाटतो. संबंधित ओळ आहे तशीच राहू द्यावी; मात्र, विडंबनाचे शीर्षक हे 'बीजेपीची धुरा वाहती नरेंद्र मोदी!' असे न ठेवता, 'निवडणुकित हे विजयी होती नरेंद्र मोदी!' असे ठेवावे. म्हणजे अनुक्रमणिकेतील परभाषीय शब्दाची समस्या आपोआपच दूर व्हावी.

तसेही, ज्या कवितेचे हे विडंबन आहे, त्या मूळ कवितेचे शीर्षक हे 'प्रत्येकाची धुरा वाहती समर्थ स्वामी!!' असे नसून 'विसकटलेली घडी बसवती समर्थ स्वामी!' असे आहे, या बाबीकडे या निमित्ताने अंगुलिनिर्देश करावासा वाटतो.

तूर्तास इत्यलम् (म्हणजे इतकेच पुरे).