भाजपची धुरा... हे वृत्तात बसेल असे वाटते. कसे ते पाहा.
वाक्यात अक्षरे जेव्हा सुटी सुटी लिहिलेली असतात (उदा. अक्षरांची उदाहरणे देण्यासाठी किंवा संक्षिप्त रूपे म्हणून) तेव्हा त्यातील लघ्वाक्षरेही दीर्घच उच्चारली जातात. त्यामुळे कवितेतही अशा लघ्वक्षराचा दोन मात्रा होतात.
येथे ती ओळ
भाजऽपऽची धुरा वाहती नरेंद्र मोदी ... अशी उच्चारली जाईल हे तुमच्या लक्षात आले असेल. त्यामुळे ती गागागागा गागागागा गागागागा... अशा प्रकारे वृत्तात बसते असे वाटते.
मी पूर्वी दिलेले उदाहरणः
उदा. (मुद्दाम बनवलेले उदाहरण. )
'ग', 'म', 'भ' इतकी कुठेच नसती साधीसुधी अक्षरे
ही शार्दूलविक्रीडितातली ओळ पाहिली तर सुरवातीची ग - म - भ ही अक्षरांची यादी वाचताना ती एकेक गुर्वक्षर असल्यासारखी उच्चारली जातात की नाही ते पाहावे.
मुळातला संपूर्ण प्रतिसाद येथे आहे