आपल्या भाषेचे नियम पाळतील, विभक्तिप्रत्ययांत, समासांत, अलंकारांत भाग निःसंकोचपणे घेऊ शकतील तेच शब्द खर्या अर्थाने भाषेत मिळून मिसळून जातात. तेच खरे घरातले शब्द असे मला वाटते.बीजेपी या शब्दाला त, चा, ची, चे, हून वगैरे बहुपयोगी मराठी प्रत्यये व्यवस्थिपणे चालून जातात त्यामुळे तो शब्द मराठीच आहे असे वाटते. चूभूद्याघ्या.ह्यासाठी मी एक अंदाज पंचे आडाखा (गमक) ठरवलेला आहे. सप्तमीचा एकवचनी 'त' हा प्रत्यय ज्या नामाला विनासंकोच लावता येईल तो शब्द मराठीतला 'घरचा' समजायला हरकत नाही.
उदा. फाईल (फायलीत) टेबल (टेबलात) बँक (बँकेत).
जो शब्द इतर घरातल्या शब्दांबरोबर सामासिक शब्दात विनासंकोच भाग घेईल तो घरातला शब्द.
उदा. ऍक्ट (ऍक्टान्वये)
असे काहीसे. प्रत्येकाने आपापली गमके तपासून पाहावीत.