गझल असेल तर मतल्यातच दोन्ही ओळींमध्ये "तो काळ गेला" शब्दसमूह आल्यावर ही गझल गैरमुरद्दफ नसावी. अर्थात प्रत्येक शेरातील "गेला" ह्या शब्दातील "ला" म्हणजे स्वरकाफिया असेल तर आणि याला स्वरकाफिया म्हणत असतील/तसे चालत असेल तर मग ही गैरमुरद्दफ रचना म्हणावयास काही हरकत नाही.
जर "तो काळ गेला" हा शब्दसमूह रदीफ असेल तर 'ओरबाडून', सर्वस्व, अस्तित्व, तोडून, ठेवून इ. इ. काफिये योजिले असतील तर स्वरकाफियाला 'अ' चालत नसावे असे वाटते.
असो... स्वरकाफिया/ गैरमुरद्दफ इ. इ. बाबतीत माझे ज्ञान तोकडे आहे. तेवढे २ शब्द वगळल्यास

वरील आमची रचना एक मुसलसल गझल आहे! अशा गझलेतील सर्व शेर एका विषयाशी निगडीत असतात. त्यांचा (शेरांचा) एकमेकांशी संबंध जोडता येतो!
नक्कीच मुसलसल  गझलेतील सर्व शेर एकाच विषयाशी निगडीत असतात/ एकाच आशयाचे असतात, त्यांचा एकमेकांशी संबंध जोडता येतो परंतु............... हा प्रत्येक शेर एक स्वतंत्र कविता असायलाच हवा, स्वतंत्र शेर म्हणून त्याचे अस्तित्व असायलाच हवे. असे माझे वैयक्तिक मत आहे. त्या दृष्टीने मला फक्त शेर क्र. ५ हा शेर एक स्वतंत्र कविता म्हणून वाचता आला.

दिल्लीमध्ये माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनेवर आपले काव्य खूपच बोलके आहे, तुमच्यातील एक संवेदनशील व्यक्ती त्यात दिसते परंतु ही गझल नाही असे माझे वैयक्तिक मत आहे