अज्ञातजी
आमच्या वरील प्रतिसादात धांदलीत गैरमुरद्दफ असे चुकून लिहिले होते.
या गझलेत रदीफ आहे......तो काळ गेला!...हा शब्दसमूह!
सर्व काफिये हे स्वरकाफिये आहेत, जिथे अ हा स्वर सांभाळला आहे!
एक प्रयोग म्हणून आम्ही ही गझल लिहिली!
स्वरकाफियांच्या गझला शक्यतोवर आम्ही लिहित नाही!
सर्व शेर नुकत्याच झालेल्या सर्वश्रुत दुर्दैवी घटनेवर बेतलेले आहेत!
प्रत्येक शेर जर सुटा आपण गुणगुणलात तरी त्याचा आस्वाद घेता येतो, जी कोणत्याही गझलेची प्राथमिक अट असते!
आपल्या प्रांजळ प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
प्रा.सतीश देवपूरकर