पूर्वीच्या अखंड रत्नागिरी जिल्ह्यात शिक्षणाची मोठी परंपरा होती. नररत्नांची खाण म्हणवला जाणारा हा जिल्हा. पुढे नाथ पै, मधू दंडवते अशांसारख्या शहरी, सुशिक्षित आणि उदारमतवादी नेतृत्वामुळे येथे सदैव पुरोगामी आणि शिक्षणाभिमुख वातावरण राहिले. जिल्ह्याचे विभाजन झाल्यावरही सिंधुदुर्ग जिल्ह्याने हा वारसा जपलाच नव्हे तर वाढवला. इथली साक्षरता हा जिल्ह्याच्या अभिमानाचा विषय आहे.  चिं. त्र्यं., महेश केळूसकर, मधू मंगेश कर्णिक, प्रवीण बांदेकर हे अलीकडील साहित्यिक तर जयवंत दळवी,ज.र.आजगांवकर,गं.दे.खानोलकर,'मनोरंजन'कार का. रा. मित्र असे गेल्या शतकातील दिग्गज या भूमीत निपजले. त्यामुळे इथे एखादे वाचनालय शंभर वर्षे चालावे यात काहीच आश्चर्य नाही.

आपल्या ह्या वृत्तांतामुळे ह्या कोपऱ्यातल्या अशा इटुकल्या जिल्ह्याच्या प्रगतीची माहिती इतरांसमोर येऊन त्यांनाही ग्रंथालय स्थापनेची प्रेरणा मिळो ही अपेक्षा.

ग्रंथालयास द्विशतकी वाटचालीसाठी शुभेच्छा आणि वाचक/कार्यकर्त्यांचे कौतुक.