अदितीला मी प्रत्यक्ष कधी भेटलो नाही. 'मनोगत'च्या 'व्यक्तिगत निरोपा'तूनच बरेचसे बोलणे होई. माझ्या घराकडं जाण्याचा रस्ता ती काम करत असलेल्या कंपनीवरूनच जातो. ती प्रदीर्घ काळ आजारी होती, याची मला काहीच कल्पना नव्हती. आश्चर्याची बाब अशी, की ती वारल्याची बातमी कळली, त्याच्याच दोनेक दिवस आगेमागे, तिच्या कंपनीवरून जाताना, मला तिची तीव्र आठवण आली होती. तशी अधूनमधूनही तिची आठवण येईच.
पूर्वी कधीही भेट न झालेल्या आणि आता यापुढेही कधीच भेट होऊ न शकणाऱया अदितीला माझी मनापासून श्रद्धांजली!