सत्यजित रे यांना अनेक जण एक थोर दिग्दर्शक मानतात. त्यांच्या तोडीचा कोणी मराठी दिग्दर्शक झाला, आणि त्याने मराठीत चित्रपट काढले, तर कदाचित त्याची श्रेष्ठ कला पाहण्यासाठी मराठी न समजणारे लोकही कदाचित त्याचे मराठी चित्रपट पाहतील. मात्र आजच्या घटकेला मराठीत असा कोणी दिग्दर्शक आहे का ?

तसेच, रेंच्या चित्रपटांना राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्धी मिळावी म्हणून इतर सामर्थ्यशाली वंगदेशीयांनी काही खास प्रयत्न केले होते का ? असेच प्रयत्न मराठीकरता झाले तर त्या चित्रपटांनाही राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळेल.