महेश,
तुम्ही म्हणता तसेही लिहिता आले असते. "मुखवटे" लिहिण्यास दोन कारणे होतीः पहिले म्हणजे, (१) अधोमुख, आणि (२) लाजरे नयन अशा दोन गोष्टींचा उल्लेख असल्यामुळे बहुवचन वापरले. पण हे तितकेसे महत्त्वाचे नाही. या दोन्हीचा मिळून एक मुखवटा मानून "मुखवटा" म्हणता येईल. दुसरे कारण हे की त्या ओळीतल्या स्वल्पविरामाकडे दुर्लक्ष केल्यास, ती "ते मुखवटेच होते बरे" अशी वाचल्यास, "बरे" हा शब्द चांगले, प्रिफरेबल या अर्थानेही घेता येईल व ओळीस व, पर्यायाने, शेरास आणखी एक, वेगळा अर्थ प्राप्त होईल. "मुखवटा" शब्द योजल्यास तसे करणे शक्य नाही कारण मग ते वाक्य 'तो मुखवटाच होता बरा' असे लिहावे लागेल, व ते काफियाभंगामुळे गझलेत बसणार नाही.