गुणवंत कर्मचाऱ्यांना टिकविण्यासाठी सर्वच आस्थापनांमध्ये प्रयत्न केले जातात. योग्य/ आकर्षक पगाराबरोबरच चांगले व खेळीमेळीचे वातावरण, सर्व पातळ्यांवर मोकळेपणा, पारदर्शी कारभार इत्यादींवर भर दिला जातो.

प्रोत्साहनासाठी अनेक कार्यक्रम केले जातात, उपक्रम राबविले जातात. उदाहरणार्थ फलकावर गुणवंत कर्मचाऱ्याचे नाव लिहिणे, उच्चपदस्थ व्यक्तीकडून प्रशंसापत्र देऊ करणे, छंदा जोपासण्यास मदत करणे, स्पर्धा/ खेळांचे आयोजन करणे सर्वांना सहभागी करून घेणे यावर अलीकडे भर दिला जातो.

या बरोबरच कामात प्रगती होण्यासाठी प्रशिक्षणाची सोय असते. एखाद्या विषयात विशेष प्रावीण्य दाखविणाऱ्या कर्मचाऱ्याला व्यावसायिक प्रशिक्षण संस्थेत कार्यशाळा वा अल्प कालावधीच्या अभ्यासक्रमासाठी पाठविले जाते.

बाकी उथळ चर्चा, वायफळ गप्पा, राजकारण हे सर्वत्रच असते. त्यात न गुंतता आपले काम करणे व प्रगतीच्या दृष्टीने वाटचाल करणे हे ज्याचे त्याच्या हाती असते.