आर्यांच्या काळात गाय-बैल इत्यादी पशुधनाकडे, संपत्ती म्हणून पाहिले जात असे. जशी हल्ली घर, जमीन इत्यादी ही संपत्ती आहे; महत्वाची आहे; तसेच तेव्हा हे प्राणी.

यज्ञात कोवळा खोंड बळी दिला जात असे. त्याचे कोणते भाग पुरोहिताला, कोणते भाग यजमानाला आणि कोणते इतर पाहुण्यांना याबाबतचे काही कुठल्याशा वेदातले (बहुतेक यजुर्वेद) श्लोक डॉ. आंबेडकरांच्या 'शूद्र मूळचे कोण' या पुस्तकात वाचल्याचे आठवते. त्यात शूद्रांना यज्ञपशूचा आतड्याचा, कातड्याचा (सगळ्यात टाकाऊ) भाग मिळावा असे काहीसे आहे, त्या संदर्भात ते श्लोक येतात.

यज्ञात बळी देण्याची प्रथा बंद करण्याचे, किंबहुना एकूणच यज्ञाचे स्तोम कमी करण्याचे प्रयत्न झाले ते बौद्ध वगैरे नवोदित धर्मांना शह देण्यासाठी. मुळात हे 'अहिंसक' धर्म पुढे आले ते यज्ञाचा अवाढव्य खर्च न झेपणाऱ्या गरिबांच्या पाठिंब्यावर. आणि हा खर्च म्हणजे मुख्यत्वे यज्ञपशू! अशी कारणपरंपरा दिली आहे. मला ती तर्कदृष्ट्या बरोबर वाटते.

एकंदरित गाय व बैलाला अवध्य दर्जा अलिकडे (!) मिळाला आहे. वेद लिहिणाऱ्या, भटक्या (?) आर्यांच्या काळात नव्हे. असे मला वाटते.