महेश....
तुमच्या "तांत्रिक" करामत मताशी सहमती व्यक्त करीत असताना असेही म्हणेन की जगभर 'लिंकन' चित्रपटाबद्दल स्पिएलबर्गचे जे कौतुक होत आहे त्यातील सर्वाधिक वाटा त्याने 'संवादा' विषयी घेतलेल्या कष्टासाठी दिल्याचे दिसून येत आहे. अडीच तासाहून अधिक लांबीच्या या चित्रपटाचा आत्मा संवादात असल्याने लिंकनची भूमिका करणाऱ्या डॅनिएल डे-लेविस या अभिनेत्याने त्यासाठी घेतलेल्या विशेष परिश्रमाचेही तितकेच कौतुक विविध माध्यमातून होत आहे. पडद्यावर चित्रपट पाहाताना त्या अभिनेत्याचे 'पाठांतर' जबरी आहे असे सतत जाणवत राहते.
"लिंकन" इज अनडाऊटेडली अ लिंग्विस्टिक अचिव्हमेन्ट...." हा शेराही लंडन टाईम्समध्ये आला असून मला वाटते 'संवादा' बद्दल तो पुरेसा बोलका ठरावा.