श्री विनायक,
आपला सावरकरांविषयी गैरसमज झालेला दिसतो. त्यांनी गोमांस खाण्यावर इतका जोर दिलेला मला आढळलेला नाही. गाईला देव मानण्याविरुद्ध त्यांनी अनेक लेख आणि निबंध लिहिले आहेत आणि त्यात समस्त वाचकांना गोमांस खाण्याचे आवाहन केल्याचे मी वाचलेले नाही.
आपले ज्या लेखांमुळे असे मत बनले आहे त्या लेखांचे तपशील द्याल का? (कुठले वर्ष, कुठे प्रकाशित झाले वगैरे?)
दरम्यान मी माझ्याकडे असलेले लेख इथे उद्धृत करायचा प्रयत्न करतो. निदान संदर्भ तरी देतो.