जेव्हा एखादी समाजसुधारणा करायची असते तेव्हा तो खाजगी प्रश्न आहे म्हणून हात झटकून चालत नाही.
 एखाद्या समाजात बायकांना शिकवायची पद्धत नसेल तर तो त्यांचा खाजगी प्रश्न म्हणून दुर्लक्ष करायचे का त्यांचे प्रबोधन करायचे?
  श्रद्धा ही अर्थातच वैयक्तिक बाब आहे. पण एखादा समाज श्रद्धेच्या आहारी जात असेल तर? उदा. माझ्या गावातील दहावीची मुले अभ्यास करण्याऐवजी सगळ्या देवळात भजन आरत्या करत सुटली आणि ते करुन चांगल्या मार्कांची अपेक्षा ठेवत असली तर माझे कर्तव्य आहे की मला जमेल त्या मार्गाने मी ह्या प्रकाराविरुद्ध मत मांडावे.
  माझा उद्देश हाच आहे की समाजाचे भले व्हावे आणि त्याकरिता त्यांच्या वैयक्तिक श्रद्धेवर टीका करणे वावगे नाही.
  गाईंचे मलमूत्रविसर्जन, वेळोवेळी उधळणे हे त्या एक निव्वळ पशुच (होय पशूच) आहेत म्हणून स्वाभाविक आहे. पण आपण त्यांना देवत्व देऊन डोक्यावर बसवले आहे त्यामुळे ह्या पशुधर्माला आपण तितका आळा घालत नाही. उलट मंडळी भाविकपणे त्या गाईच्या कपाळाला हात लावून नमस्कार करताना आढळतात.
    गाईला देव मानू नका ह्या विधानाचा अर्थ म्हणजे गोमांस खा हा आहे हे आपण कसे ठरवले? मी वर खुलासा केलेला आहे.