थॅंक्स विसुनाना.... तुम्ही "जंगलपट" बद्दल उपस्थित केलेल्या शंकेच्या अनुरोधाने मग मीदेखील लेखातील त्या वाक्याकडे पुन्हा गेलो आणि विचार करू लागलो की, मी तरी 'लाईफ... ' चा जंगलपट असा उल्लेख का केला असेल ? तसं पाहिलं तर जवळपास 'टारझन' धर्तीची ही एक 'ऍडव्हेंचर मूव्ही' असून एकप्रकारे फॅंटॅसी गटात येऊ शकते. पण चित्रपटातील नित्यनेमाने दिसणारे 'झू किंवा जंगल' सम वातावरण.... गूढ आणि जादुमय भासणारे ३डी परिणाम....
आदीमुळे असेल कदाचित मी फॅंटॅसीऐवजी याला जंगलपट म्हटले असणार.

अर्थात पारंपारिक व्याख्येनुसार तो तसा नाही हे मला कबूल.