गाईविषयीची कृतज्ञता व्यक्त करायला तिला पुरणपोळी आणि तत्सम सुग्रास अन्न नैवेद्य म्हणून दाखवणे, तिची षोडशोपचारे पूजा करणे असे आपल्याला अभिप्रेत आहे का? कारण गोभक्त तसे करतात.
कितीही उपयुक्त असला तरी तो एक पशु आहे. त्याला उत्तम चारापाणी द्या, स्वच्छ ठेवा, योग्य ती औषधे, जीवनसत्त्वे वेळोवेळी द्या. पण पूजा कशाला?
त्या पशुला उत्तम चाऱ्यापेक्षा पूजा जास्त आवडते असे वाटते का आपल्याला?
देव मानू नका म्हणजे त्या पशुला निर्दयपणे वागवा असा विपरित अर्थ काढू नका.
कृतज्ञता असायला अजिबात हरकत नाही पण हिंदूंनी ह्या भावनेला अत्यंत विकृत स्वरुप दिलेले आहे.