कधीतरी शेळ्या मोकाट दिसल्या तर तो नियम होत नाही. माझ्या अनुभवात मी गाई आणि बैल हीच मंडळी बाजारात मोकाट फिरण्यात आघाडीवर असतात असे पाहिले आहे. हल्ली कुत्रेही वाढलेले आहेत पण तो सध्याच्या चर्चेचा विषय नाही म्हणून नको.
म्हशी, बकऱ्या, मेंढ्या, कोंबड्या वगैरे पाळीव प्राणीपक्षी जवळजवळ कधीच पाहिलेले नाहीत.
भटक्या गाई ह्या पाळीव असतात तेव्हा मानवाचे पर्यावरणावरील अतिक्रमण वगैरे मुद्दे ह्या संदर्भात गैरलागू आहेत. गाय व बैल हे रानटी अवस्थेत फिरणारे प्राणी नाहीत. माणूस सहस्रावधी वर्षे त्यांना पाळतो आहे. रानरेडे आणि रानम्हशी जंगली असतील पण गायबैल नसतात. निदान महाराष्ट्रात तरी मी तसे पाहिलेले नाही.