अवांतरः 'इच्छा' या शब्दातला च 'चमचा' च असा थेट उच्चारून पाहा - मजा येते/मझा येतो - माझी आजी तसा उच्चार करत असे.

सुमारे तीस-बत्तीस वर्षांपूर्वी दूरदर्शनवर 'प्रतिभा आणि प्रतिमा'मध्ये 'स्वरभास्कर' ह्या शीर्षकाची पं. भीमसेन जोश्यांची मुलाखत झाली होती. ती पाहत असताना त्यांनी 'इच्छा'तल्या छ चा उच्चार असाच दंत्य केलेला ऐकल्याचे आठवते.