"लाईफ... " चे असे वेगळ्या नजरेने कुणी परीक्षण करील असे चित्रपट पाहून झाल्यानंतर माझी समजूत झाली होती. पण विसुनाना यानी आपल्या लिखाणाने एक आगळा तसा सुखद अनुभव दिला हे आवर्जून सांगतो.
त्रिमिती चा प्रभाव दर्शकाच्या सिनेमा पाहणीवर नक्की पडतो हे नाकारण्यात अर्थ नाही.
 जगभरातील विविध भाषांतून या चित्रपटाबाबत जे मत जाहीर जाले आहे त्या साऱ्या समीक्षकांनी कथेच्या बरोबरीने त्रिमिती तंत्राचीही तोंड भरून स्तुती केल्याचे दिसून येईल.

काहींनी तर 'लाईफ... ' ची तुलना डेव्हिड लीनच्या 'लॉरेन्स ऑफ अरेबिया'शी केली आहे.... ही एक मिळकतच म्हणावी लागेल आंगलीसाठी.