उत्तम लेख! आवडेश. 

आम्ही तर घरातल्या घरात कचरा निर्माण झाल्याझाल्या नियोजित ठिकाणी टाकायची दक्षता घेतो. 

स्वयंपाकघरातून निघणारा भाजीपाल्याचा कचरा, अनवधानाने एखादवेळी वाया गेलेले अन्न, बागेतला फुलापानाफळांचा कचरा हा सरळ बागेतल्या गांडूळखताच्या खड्ड्यात टाकतो. पूर्वी बागेत खत म्हणून टाकायला कधी युरीया तर कधी शेण/लेंडीखत विकत आणावे लागायचे पण आता घरच्याच गांडूळखताने भारीच सोय झाली आहे.

पूर्णपणे वापरल्या गेलेल्या कागदाची कुंडी वेगळी ठेवली आहे. कधीमधी ओला नारळ आणला तर त्याची करवंटी आणि केसाचा भाग देखील याच कागदांच्या कुंडीत टाकतो. बागेतल्या सुकलेल्या फांद्यांचा बराच पसारा झाला किंवा कटाई केल्यावर निघणारा फांद्यापानांचा पसारा सुकवून, कागदांबरोबर जाळून टाकतो. याची राख झाडांच्या मुळाशी टाकली की कीड मरायलाही मदत होते.

घर झाडून निघणारा निव्वळ मातीचा भाग तर सरळ बागेत टाकतो.

या साऱ्यातून उरणाऱ्या कचऱ्यातूनही काही जुगाड करता येतो का याचा इंटरनेटवर शोध घेताना खालील गोष्टी लक्षात आल्या -

प्लॅस्टीकच्या पिशव्यांपासून बारीक पट्ट्या कापून क्रोशे विणकाम करून अनेक गृहोपयोगी वस्तू विणता येऊ शकतात. हा उपाय मला भारी आवडलाय. लगेच अवलंबायचे डोक्यात घेतलेय त्यामुळे पिशव्यांची जमवणूक सुरू केली आहे.

केस आणि नखेदेखील बायोडिग्रेडेबल असतात फक्त त्यांना डिग्रेड व्हायला प्रचंड वेळ लागतो. डिग्रेडेशनची प्रक्रिया जलद करण्यासाठी काहीउपाय करता येऊ शकतील का?