टगवंतरावांनी वर
सभी अहल-ए-दुनिया ये कहते हैं हम से
के आता नहीं कोई मुल्क-ए-अदम से

याचे भाषांतर आहे काय / कसे होऊ शकते? ('अहल' म्हणजे 'पब्लिक' ना? )


अशी आक्षेपवजा सूचना मांडलेली आहे. त्याबद्दल
मला अहल चा अर्थ कोठेतरी रेकॉर्ड किंवा नोंद असा मिळाला. (कोठे ते नेमके आता सापडत नाही. तेव्हाच लिहून ठेवायला पाहिजे होते. ) त्यावरून अहले दुनिया म्हणजे जगातल्या नोंदी असा अर्थ घेऊन मी जगाचा इतिहास असे भाषांतर केले.
असो
आता अहल म्हणजे जनता असे टगवंतराव म्हणत आहेत त्यावरून खालीलप्रमाणे कडवे देत आहे

जगातील जनता - वदे आपल्याला
निवर्तून कोणी - न परतून आला
....
...

मात्र
अहले दुनिया बरोबरच अहले वफा अहले किताब अहले अमूक अहले तमूक असे खूप काही सापडते त्यावरून अहलचा अर्थ नीट ध्यानात येत नाही.
नेमके काय आहे, कुणी सांगेल का?