मूळ प्रस्तावात रोहिणी यानी तसा स्पष्ट उल्लेख केलेला नाही हे मान्यच. तरीही एकसारखे दिसणारे शब्द जर भिन्न अर्थ दर्शविणारे असतील आणि ते उत्तरात वापरले तर कोड्याची,
नाही म्हटले तरी, खुमारी काहीशी कमी होईल असे वाटते.
"काल रातीला सपान पडलं.... " ह्या गाण्याला उत्तर म्हणून एखाद्याने 'रातीला' घेऊन 'रात्रीस खेळ चाले या गूढ चांदण्याचा...' निवडले तर ते नक्की खपू शकेल, पण 'रातीला' साठी 'वरातीला' घेतले तर वाचणाऱ्याला ते खटकेलच.
असो. हा काही मोठा वादाचा विषय नाही, फक्त भाषाप्रेमापोटी 'फड' व 'फडफड' बद्दल लिहिले होते.