गाई, (आणि इतर प्राण्यांनीही काही घोडे मारलेले नसल्यामूळे) बैल, शेळ्या, मेंढ्या, बकऱ्या इत्यादी जनावरे आणि कोंबड्या, बदके इत्यादी पक्षी कापून खाऊ नये. त्यातल्या पाप-पुण्याच्या भाकड कल्पनांमूळे नाही तर ते खाल्ल्याने ऱ्हदयाच्या निरनिराळ्या असाध्य व्याधी होऊ शकतात म्हणून. प्रामुख्याने आपण जर उष्णकटिबंधात किंवा विषुववृत्तिय पट्ट्यांत राहत असाल तर मग तर मांसभक्षण टाळावेच असे वैद्यकशास्त्र सांगत असल्याचे निदर्शानास येईल. पाश्चात्त्य देशांमध्ये तर मांसभक्षणामूळे येणाऱ्या स्थुलतेमूळे आणि त्यामूळे येणाऱ्या व्याधींमूळे अनेक लोक मरतात असे आढळून आले आहे. असो. तब्येतीच्या आणि आरोग्याच्या बाबतीत बॅरिस्टरांपेक्षा डॉक्टरांचा सल्ला मानावा असे वाटते.
'ब्राह्मण आवडीने बछड्याचे मांस खायचे' हे वाक्य समजा कितीही खरे असले तरी त्यामूळे ब्राह्मणांनी हिरमसून जाऊ नये आणि ब्राह्मणेतरांनी हीहीहीहीही ही करू नये. कारण त्याचा फायदा दोघांनाही नाही. देव कशात पाहावा हा व्यक्तिगत प्रश्न असल्याचा निर्वाळा येथील बऱ्याच मनोगतींनी दिला आहे हे विशेषत्त्वाने नमुद करावेसे वाटते.