वळणे = दुखणे असाही एक अर्थ आहे. विशेषतः वांब(क्रॅम्प) आल्याने. माझ्या लहानपणी माझे वडील मला "पाय वळताहेत, दाबून दे" असे म्हणायचे त्याची आठवण झाली. कदाचित कोकणात जास्त वापरात असेल.
चालतो आहे सरळ, पण, गाव काही येइना....
पावलांना माझिया आता वळावे वाटते!
ह्या द्विपदीवरून ते आठवले. पावलांना अशा प्रकारे 'वळावे' वाटते ह्यावरूनही एखादी द्विपदी करता येईल असे वाटते.