विठ्ठल तो आला, आला, मला भेटण्याला
मला भेटण्याला आला, मला भेटण्याला

तुळशी-माळ घालुनि गळा कधी नाही कुटले टाळ
पंढरीला नाही गेले चुकूनिया एक वेळ
देव्हार्‍यात माझे देव ज्यांनी केला प्रतिपाळ
चरणांची त्यांच्या धूळ रोज लावी कपाळाला