कधी रे येशील तू, जिवलगा, कधी रे येशील तू?
दिवसामागून दिवस चालले, ऋतू मागूनी ऋतू

धरेस भिजवूनी गेल्या धारा
फुलून जाईचा सुके फुलोरा
नभ धरणीशी जोडून गेले सप्तरंग सेतू...
कधी रे येशील तू, जिवलगा?...