मधु मागशी माझ्या सख्या परि
मधुघटचि रिकामे पडति घरी 
आजवरी कमळांच्या द्रोणी
मधू पाजिला तुला भरोनी
सेवा ही पूर्विची स्मरोनी
करिं रोष न सखया दया करी