ही गुलाबी हवा
वेड लावी जीवा
हाय श्वासातही
ऐकू ये मारवा

तार छेडी कुणी
रोमरोमांतुनी
गीत झंकारले
आज माझ्या मनी
सांज वाऱ्यातही
गंध दाटे नवा...