छिलणे हा शब्द मराठी आहे का?

मुळात नसावा. पण मी लहानपणापासून ऐकत आणि वापरत आहे. इ. चौथी पर्यंत आम्हाला अक्षरलेखनाचा वर्ग असे तेथे बोरूने अक्षरलेखन शिकवले जायचे तेथे बोरू छिलणे हा शब्दप्रयोग सर्रास प्रचलित होता.

हिंदीतल्या छीलना शब्दापेक्षा मराठीतल्या छिलणे शब्दाचे अर्थ आणि वापर मर्यादित आहेत. हिंदीत सोलणे किंवा तासणे ह्या दोन्ही अर्थांनी तो शब्द वापरला जातो असे दिसते. मराठीत मात्र तासणे अशा एकाच अर्थाने तो वापरल्याचे मी ऐकलेले आहे.

जालावर सापडलेली काही उदाहरणे :

ही मोल्स्वर्थ शब्दकोशातील नोंद पाहावी. (तेथे व्युत्पत्ती हिंदीच दाखवलेली आहे. )

महाराष्ट्र शब्दकोशातील उल्लेख (शब्दार्थांची यादी पाहावी )

महाराष्ट्र शासननिर्मित मराठी विश्वकोशातील उल्लेख (दुसरा परिच्छेद पाहावा)

कदाचित आणखीही सापडतील.

स्वारस्य आणि पाठपुराव्याबद्दल धन्यवाद.