पाककृती सुरेखच लिहिली आहेस फक्त यांना चिकवड्या नाही तर साबुदाण्याच्या उपवासाला चालणाऱ्या पापड्या म्हणतात. चिकवड्या म्हणजे गव्हाचा चीक काढून, शिजवून करतात त्या उपवासाला न चालणाऱ्या पापड्या. साबुदाण्याच्या पापड्यांमध्ये 'चिका'चा संबंध नाही त्यामुळे त्यांना चिकवड्या म्हणणे संयुक्तिक होणार नाही असे वाटते.
अजून एक म्हणजे पाककृतीमध्ये तू प्लॅस्टीकचा कागद म्हणालीस त्याऐवजी मेणकापड घेतल्यास उत्तम कारण या पापड्या मिश्रण गरम असेपर्यंतच पटापट टाकून पसरवाव्या लागतात.. मिश्रण घट्ट झाले तर मग सांडगे टाकायची वेळ येते (अर्थात कोणी तेलात बुडवून तसेच कच्चे गट्टम करायला उपस्थित नसेल तरच! ). प्लॅस्टीकचा कागद पातळ असेल तर गरम मिश्रण ओतल्याने तो कागदच वितळण्याची शक्यता असते त्यामुळे एकतर प्लॅस्टीकचा कागद जाड असावा किंवा सरळ मेणकापड घ्यावे, असे मला वाटते.
मिश्रण गरम असेपर्यंतच कारभार आटोपायचा असल्याने जास्त पापड्या करून ठेवायच्या असल्यास २-४ जणींनी मिळून तरी कराव्यात किंवा हप्त्याहप्त्याने तरी करायला घ्यावे.