रूप पाहतां लोचनीं ।    सुख जालें वो साजणी ॥१॥

तो हा विठ्ठल बरवा ।    तो हा माधव बरवा ॥२॥

बहुतां सुकृतांची जोडी ।    म्हणुनि विठ्ठलीं आवडी ॥३॥

सर्व सुखाचें आगर ।    बाप रखुमादेवीवरू ॥४॥