'रेर ईल्वा कोट' कोड्याचे उत्तर आहे 'रेल्वाई कोटर' हे धोंडुजा इंगोलेंनी लिहिलेले पुस्तक. या पुस्तकातली मला अत्यंत भावलेली गोष्ट म्हणजे पुस्तकाच्या नावासकट आतल्या साऱ्या मजकुरातदेखील, पोटापाण्याचे काम देणाऱ्या रेल्वेला आई संबोधत तिचा 'रेल्वाई' असा केलेला उल्लेख. संपादित न केलेला मजकूर पुस्तकरूपाने वाचायला हरकत नसल्यास अत्यंत  वाचनीय असे पुस्तक आहे हे. असो.

आता पुढचे कोडे - व आधी सापाचा ऊपास