इतक्या सुंदर आस्वादात मध्येच क्षमस्व कशाला म्हणताय? अशा खेळांच्या निमित्ताने कुठूनकुठून निरनिराळी गाणी मनात येत असतात.. खेळात ती सांगताना आपली अशी आस्वादक मतेही प्रदर्शित केली तर मजाच वाढते की त्यामुळे. मलातरी यात काहीच क्षमा करण्यासारखे वाटले नाही. अर्थात एकाचवेळी एका गाण्याला दोन उत्तरे आली तर अशा (खेळासाठीच्या) अवांतर लेखनाने आपले उत्तर बाद होऊ शकण्याचा धोका राहतोच.. पण भावना व्यक्त केल्याने मिळणाऱ्या आनंदापुढे हा धोका क्षुल्लक आहे असे माझे मत. असे सारे असल्याने बिनधास्त लिहावे असे सुचवावेसे वाटते.